Ad will apear here
Next
सफर मावळची
मावळ हा सह्याद्रीच्या सावलीत वसलेला तालुका. सह्यकड्याबरोबरच याला मोठा इतिहासही आहे. जंगल, डोंगर, लेण्या आणि निसर्गाने नटलेल्या मावळाची ओळख ओंकार वर्तले यांनी ‘सफर मावळची’ मधून करून दिली आहे. लेणी, वास्तू, शिल्पे, विहिरी या विभागात नैसर्गिक रांजणखळगे, कार्ला लेणी, पाल-उकसान लेणी, कल्हाटची गिरिशिल्पे, घुमटाची विहीर, टाकवे खुर्द, गधेघळ आदी २६ ठिकाणे आहेत. राजमाचीसह मोगगिरी, इंदोरी, चौराई डोंगर आदी अपरिचित, तसेच गिरिप्रेमींचे आवडते गड-किल्ले यांची माहिती यात दिली आहे. मावळातील प्राचीन घाटवाटा, मंदिरांच्या माहितीचाही समावेश यात आहे. मावळाचा इतिहास कथन करणाऱ्या वारसास्थळांची ओळख यात करून दिली आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घर, दुर्गप्रेमी साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचे घर, वडगावच्या ऐतिहासिक लढाईचे स्मारक, महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प आदी स्थळे आहेत. निसर्गाने नटलेल्या मावळातील धबधबे व तेथील खाद्यसंस्कृतीची माहितीही आहे. प्रत्येक ठिकाणाच्या माहितीनंतर तेथे जाण्याचा मार्गही दिला आहे. पर्यटकांसाठी या पुस्तकातील ७० प्रकरणांमधून संपूर्ण मावळ ‘उलगडला’ आहे. 

पुस्तक : सफर मावळची
लेखक : ओंकार वर्तले
प्रकाशन : नावीन्य प्रकाशन
पृष्ठे : २२४ 
मूल्य : २५० रुपये

(‘सफर मावळची हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZOLCJ
Similar Posts
प्रबळगड ट्रेक गेली १५हून अधिक वर्षे सह्याद्रीतील वाटांवर सातत्याने आणि सहज भटकंती करणारे सुशील दुधाणे यांचे ‘घाट वाटा’ हे पुस्तक एक सुगम वाटाड्या म्हणून ट्रेकर्सना उपयुक्त आहे. पुणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमधील आनंददायी सफरींचे वर्णन या पुस्तकात आले आहे. रायगड जिल्ह्यातील प्रबळगडाच्या भटकंतीबद्दल मार्गदर्शन
शिवस्मारकासोबत हवे गड-किल्ल्यांचे संवर्धन कोणतीही स्मारके येणाऱ्या प्रत्येक पिढीला संदेश देण्याचे काम अविरतपणे करत असतात. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढील अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रस्तावित शिवस्मारक महत्त्वाचे ठरेल पण त्याला महाराजांनी उभारलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन, पुनरुज्जीवन करण्याच्या उपक्रमाची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे
आडवाटेवरची भटकंती शहरातील सिमेंटच्या जगलांना कंटाळलेल्यांना कायम हिरवा निसर्ग, निसर्गाच्या कुशीत दडलेले सौंदर्य, गडकिल्ले, मंदिरे, लेण्या आणि बरेच काही साद घालत असते. निसर्गाच्या प्रेमातून आणि अनवट वाट धुंडाळण्याच्या उर्मीतून खऱ्या अर्थाने ‘भटक्या’ असणाऱ्या ओंकार वर्तले यांना नवनवीन ठिकाणे साद घालत गेली. त्यातून त्याची
सह्याद्रीतील ऑफबीट भटकंती भटकंती म्हणजे केवळ मौजमजा नव्हे तर भटकंती म्हणजे नवनवीन ठिकाणे पाहाणे, संबंधित परिसराची माहिती मिळवणे, तेथील भौगोलिक-सामाजिक ज्ञान वाढवणे, इतिहास जाणून घेणे. ओंकार वर्तले यांच्या या पुस्तकाने नेमके हेच साध्य केले आहे. सह्याद्रीतील कडेकपारी हे भटक्यांचे लाडके ठिकाण. सह्याद्रीतील अपरिचित ठिकाणांची सफर वर्तले यांनी या पुस्तकातून घडविली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language